COEP गीत
येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही.
आजचे अंकुर उद्याच्या, आसमंती सूर्य होती
प्राक्तनांची शिवधनुष्ये, राम इथले ध्वस्त करिती
ज्ञान येथे सर्जनाची, कास धरते निर्मिताना
माणसाला माणसाचे, भान आहे चालताना
विश्वस्त झेप आहे येथे कलंदरांची,
सृजनात धुंद होणे येथे अतर्क्य नाही.
पंथ आहे नेहमीचा,
गुरुवंतांच्या बळाचा
पालकांची थाप आहे,
विनयही ‘ निश्राप ’ आहे
या अशा सर्जनाचा माणसाच्या गौरवाचा
स्त्रोत हा निर्व्याज आहे, दशदिशांना गाज आहे
उद्देश जिंकण्याचा येथे अजिंक्य आहे,
मधुकोष निर्मितीचा याहून रम्य नाही.
येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही.
–श्वेता पाटोळे / निखील बेललारीकर
Final Year B.Tech-Mechanical (2009)
